You are currently viewing बळीराजाची प्रभात फेरी

बळीराजाची प्रभात फेरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बळीराजाची प्रभात फेरी*

 

सोंगढोंग ते ना माॅर्निंग वाॅकचे

विळा कोयता बांधून कमरेला

सहज घेऊन नांगर खांद्यावर

चालू लागतो भास्कर भेटीला

 

पाहून घड्याळ मनगटीचे

दिनकर होतो तेव्हा चकित

कोंबडा सुध्दा कबूल करतो

फारच चढली काल रात्रीत

 

तंत्र बिघडले आज कालचे

आळशी झाले सारे जण

सूर्य कोंबडा अपवाद नाहीत

रोजच नसतो तरी सण

 

पोटासाठी नसते तडजोड

उठावे लागते बळीराजाला

पाढा वाचून नाही चालत

सबबी ऐकवून कर्तव्याला

 

पाऊस कधी कां कुठे पडतो

पाहून राबाचा धूर आकाशी

पकडून मुहूर्त मृग नक्षत्राचा

लघट कराया येतो धरणीशी

 

बळीराजाची प्रभात फेरी

म्हणून चर्चेचा झाला विषय

परीक्षा घेतोय निसर्ग सर्वांची

करत नाही नुसता अभिनय

 

विनायक जोशी ✒️ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

प्रतिक्रिया व्यक्त करा