*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तूच माझा सखा*
*धरा नि पाऊस*
आकाशी दाटती
सावळले मेघ
चमकून जाते
सौदामिनी रेघ….
तापलेली धरा
वैशाख वणवा
आतुरता तुझी
भेगाळल्या जीवा…
अधीरते मन
वाट किती पाहू
तुझा हा विरह
कसा सांग साहू….
घन ओथंबले
मयूर नाचला
दृष्टी नभाकडे
पाऊस दाटला….
कोसळता सरी
भिजे अंग अंग
धरणी खुलते
जागे प्रेमरंग….
तूच माझा सखा
भरला दिठीत
पाऊस सखा रे
भेटता मिठीत……!!
•••••••••••••••••••••••••••
अरुणा दुद्दलवार@✍️