*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मला काहीतरी करायचं*
मला काहीतरी करायचं आहे
आदर्श जीवन जगायचं आहे
ज्ञानाचा प्रसार करायचं आहे
सुखी जग बघायचं आहे
स्त्रीची गुलामी घालवायची आहे
छळ तिचा रोखायचा आहे
सन्मान तिला द्यायचा आहे
मला काहीतरी करायचं आहे
गरीबांची गरीबी हटवायची आहे
श्रमाची महती पटवायची आहे
दु:खांना दूर करायचं आहे
समाधान जगात करायचं आहे
मला काहीतरी करायचं आहे
पतीला साथ द्यायची आहे
मुलांचं जीवन घडवायचं आहे
कर्तृत्व गगनाला भिडवायचं आहे
मला काहीतरी करायचं आहे
अनुपमा जाधव