ठाणे :
नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा स्वानंद सेवा सदन हा उपक्रम दिव्यांगासाठी खुला करण्यात आला आहे. स्वानंद सेवासदनची ही इमारत विरारच्या अर्नाळा गावात उभी केली आहे. हे राष्ट्रीय स्तरावरचे पहिले दिव्यांग निवासी शिक्षण व प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रोजेक्टचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले होते. यानंतर एका वर्षात इमारत बांधून पूर्ण झाली आहे.
अजून थोडे काम बाकी आहे पण रविवारी 26 मे रोजी या इमारतीचे पहिल्या माळ्याचे उद्घाटन झाले. या इमारतीचे उद्घाटन स्वामी प. पू. श्री श्री श्री शिवानंद सरस्वती (कळवे मठ गोवा) यांनी केले. या इमारतीच्या तळमजल्यावर श्री स्वामी समर्थांचे शक्ती स्थान म्हणजे मठ आहे.
या सेंटरमध्ये कोरोना काळात अपंग मुलांच्या एकल पालकाचे निधन झाले आहे, अशा मुलांना त्यांच्या उरलेल्या एकल पालकासोबत कायमस्वरूपी विनामूल्य या स्वानंद सेवासदन मध्ये राहता येणार आहे. इथे दिव्यांगांच्या शिक्षणाची व प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी नूतन गुळगुळे फाउंडेशन घेणार आहे. आदिवासी भागातील २५ दिव्यांग मुल व अन्य २५ दिव्यांग मुलांना इथे राहता येणार आहे.
स्वामींच्या कृपेने या मुलांना ध्यानधारणेतून (मेडिटेशमधून) मानसिक दृष्ट्या सुदृढ करण्यात येईल. त्याचबरोबर विविधांगी दिव्यांग प्रशिक्षण वर्ग येथे चालवले जाणार आहेत. त्याचबरोबर जॉब करणाऱ्या पालकांना आपल्या दिव्यांग मुलांना या सेंटरमध्ये ठेवण्याचे प्रव्हीजनही करण्यात येणार आहे. हे कार्य मात्र सशुल्क असणार आहे. त्यांचे संगोपन शिक्षण येथे होईल.
यावेळी स्वामी प. पू. श्री श्री श्री शिवनंद सरस्वती म्हणाले. माणसाने आपले नित्याचे संसारिक जीवन जगताना, समाजाचा विचार करून जगायला हवे. कारण परमार्थ हा खूप मोठा योग आहे. त्यातून माणसाला जलद गतीने सत्कर्मातून उन्नती व उत्कर्ष साधता येतो. या प्रकारचे कार्य गुळगुळे कुटुंबाने तिथे सुरू केले आहे. त्यांना स्वामी कृपेने फार मोठी आध्यात्मिक शक्ती लाभो. अशा स्वरूपाचे विचार स्वामीजींनी या ठिकाणी मांडले.
या कार्यक्रमात अर्नाळा गावचे सरपंच नंदकुमार घरद विरार महानगरपालिकेच्या विद्यमान माजी महापौर प्रणीला पाटील, मजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपा पक्षाचे राट्रीय सचिव सुलील देवधर, मा. आमदार हितेंद्र ठाकूर मा. खासदार सावरा साहेब एन जी एफचे सल्लागार अमरनाथ तेंडुलकर, एन जी एफच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे, ट्रस्टी विनायक गुळगुळे, पुष्कर गुळगुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या विचारातून नूतन गुळगुळे यांच्या या कार्याला सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आणि त्या प्रकारे आर्थिक मदतही देवू केली आहे. पुढेही ते अशाच प्रकारे या संस्थेला मदत करतील. असा सहकार्यात्म विचार इथे या सर्वांनी व्यक्त केला. अर्नाळा गाव व विरार परिसरातील सर्वांनी या प्रोजेक्टला अनेक वेळा मदतीचा हात दिला आहे त्यामुळे हे दिव्यांग केंद्र उभे राहिले आहे.
गुळगुळे पती-पत्नी यांचा मुलगा पुष्कर हा सेलेब्रल पालसीने दिव्यांग म्हणून जन्मला आला तेव्हापासून या दोघांनी या मुलाची सेवा करत पुष्करला आपल्या पायावर उभे केले. मग त्याच्या प्रेरणेने इतर दिव्यांगांना आपण मदत करावी असे ठरवले. करता करता ही स्वानंद सेवासदन इमारत उभी राहिली.
त्यांची नूतन गुळगुळे फाउंडेशन ही संस्था 2014 साली स्थापन झाली. यानंतर त्यांनी 2015 ला ध्येयपूर्ती दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कारातून विशेष कार्य करणाऱ्या दिव्यांगांना सन्मानित केले. समाजातील दिव्यांगांच्या पालकांना दिव्यांग सामाजिक योजनेबद्दल सतर्क केले व त्या पालकांना मानसिक, कौटुंबिक आधार दिला. त्यातूनच पुढे या दिव्यांग सेंटर निर्मिती आधी मनात झाली. असे आपल्याला नक्की म्हणता येईल. ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यासाठी गुळगुळे कुटुंबीयांना सहकार्याचा हात द्यावा. त्यातून हे कार्य पूर्णत्वास जाईल. असे ठाणे शहरातील साहित्य, पत्रकार अॅड रुपेश पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.
संपर्क – 9819141906
रुपेश पवार
पत्रकार