मुंबई:
वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह प्रस्तुत, ‘प्रज्ञासूर्य’ प्रातिनिधिक काव्यसंग्रह रविवार दिनांक २६ मे रोजी, रोहिणी पब्लिकेशनच्या व्यवस्थापक अध्यक्षा तथा प्रकाशिका मा. रोहिणी रामू माया वाघमारे यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईत ऑनलाईन पद्धतीने मोठ्या थाटात संपन्न झाला.
‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रह महापुरुषांच्या जीवन कार्याचा अनमोल ठेवा असून,नवपिढीला प्रेरणादायी व जीवनमार्ग ठरेल,असे मत प्रकाशिका रोहिणी वाघमारे मॅम व संपादक/संकलक मा. बबनराव वि.आराख यांनी प्रकाशनवेळी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
सदर काव्यसंग्रहास राट्रकवी सऐऐकम यांनी प्रस्तावना लिहिली असून, जेष्ट साहित्यिक लेखक,मा.अरुण वि. देशपांडे यांची पाठराखण तथा शुभेच्छा व अभिप्राय लाभला आहे.
या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यत यावेळी अनेक साहित्यिक कवी हजर होते. दरम्यान, प्रकाशन सोहळ्यानंतर झालेल्या कविसंमेलनात कवी, कवियत्री यांनी सहभाग नोंदविला.
सदर कार्यकमाचे सुत्रसंचालन कवी मनोहर पवार यांनी केले तर मनोगत राहिणी वाघमारे यांनी, तर संपादक/संकलक, बबनराव वि. आराख यांनी आभार व्यक्त केले.सदर ऑनलाईन सोहळ्यात महाराष्ट्रातून अनेक भागातून सहभागी कवी लेखक हजर होते .
‘प्रज्ञासूर्य’ प्रातिनिधिक संग्रहात डॉ .श्रद्धा सुनील वाशिमकर, अपर्णा अनिल पुराणी, सौ रेखा सतीशराव देशमुख, लैलशा भुरे, वैशाली प्रवीण शिंदे, सौ संगीता गोरखनाथ साळुंखे, हेमांगी बोंडे, आचार्य ज्योती बनसोड, मृण्मयी गणेश काळे, बबनराव आराख, दीपक कुमार सरदार, अशोक भगवंत वाघमारे, डॉ. सुरेश कोराडे, चंद्रकांत संभाजी बोर्डे, अंगुलीमाल निंबाळकर, डॉ. चंद्रशेखर नामदेव मुळे, मंगेश मालती मधुकर मेथी, वसंत चिंधाजी गवळी, विजय तानाजी पाटील, मनोहर पवार केळवद, संजय मुकुंदराव निकम आदी. साहित्यिक कवींनी यांच्या आपल्या दोन-दोन रचना या पुस्तकासाठी दिल्या आहेत. पुस्तकाचे संपादन व संकलन लेखक,कवी बबनराव वि.आराख गांगलगांव यांनी केले. तर पुस्तक छपाई, बांधणी, रोहीणी पब्लीकेशन मुंबई यांनी केली असून मुखपृष्ठ सुंदर आहे.
सर्व महामानवाच्या वैचारीक कविता असलेला ‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रह प्रत्येकांनी वाचावा, आणि आपल्या संग्रही ठेवावाअसाच आहे.
‘प्रज्ञासूर्य’
संपादन/संकलक
बबन वि. आराख
गांगलगाव,जि. बुलढाणा
7875701806