You are currently viewing ती आणि मी एकाच प्लॅटफॉर्मवर

ती आणि मी एकाच प्लॅटफॉर्मवर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*‘ती आणि मी एकाच प्लॅटफॉर्मवर’*

 

*********************

तिला आणि मला

गाडी पकडायची होती

म्हणून ती धावत होती

मी धावत होतो

धावता धावता ती आणि मी

एकाच प्लॅटफॉर्मवर थांबलो

तिने मला गाडी येण्याचा टाईम विचारला

आणि रोज आमच्या भेटीगाठीचा

सिलसिला सुरू झाला

 

रोज आम्ही एकाच वेळी

गर्दीतून वाट काढत

एकाच प्लॅटफॉर्मवर यायचो

ती तिरकस कटाक्ष टाकून बघायची

मी तिला पाहून हसायचो

एकाच गाडीत बसून

एकाच ठिकाणी उतरायचो

मागे वळून बघताना

वेगळे व्हायचो

 

संध्याकाळी न चुकता

पुन्हा तिथेच भेटायचो

एकमेकांना नजरेत भरायचो

गाडीत चढण्याधी डोकावुन बघायचो

हलकं फुलकं स्माईली देऊन

परतीच्या प्रवासाला लागायचो

 

खूप वाटायचं की तिच्याशी बोलावं

पण नाही जमलच नाही

कधी कधी जवळ जायचो

तेव्हा गाडी यायची

ती आणि मी तसाच

गाडीत बसायचो

एकाच ठिकाणी उतरून

संध्याकाळच्या भेटीसाठी

पुन्हा वेगळे व्हायचो

 

असं खूप दिवस चाललं

आम्ही सोबतच यायचो

एकमेकांना बघायचो

ती दुरवर असायची तरी

लाजरबूजरं हसायची

पण…..

एकाच प्लॅटफॉर्मवर असुनही

मला तिच्याशी बोलता आलं नाही

दोघांमधलं अंतर कमी झालं नाही

फक्त एकमेकांकडे पाहून हसत राहीलो

न चुकता भेटत राहीलो

 

रोज आम्ही धावत जायचो

एकाच प्लॅटफॉर्मवर यायचो

गाडीची वाट बघायचो

एकमेकांना स्माईल द्यायचो

एकाच ठिकाणी उतरून

पुन्हा भेटीसाठी वेगळे व्हायचो

खरचं न बोलताही प्रेम होऊ शकतं

याच आश्चर्य वाटत होत

दुर उभं राहून फक्त नजरेने बोलन होत

खरंतर रोज एकमेकांना भेटून सुध्दा

आम्ही एकमेकांचे झालो नाही

पण काहीही झालं तरी

आमच्या प्रवासाची गाडी मात्र

कधीच चुकवली नाही.

पुन्हा एकमेकांना भेटण्यासाठी

भेटून वेगळं होण्यासाठी

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा