*हीच ती वेळ एकत्रीत येऊन हुकूमशाही गाडण्याची*
*विद्यूत वितरण च्या गुरुवारी ३०मे रोजी होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण संदर्भात असलेल्या तक्रारी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,शाखा अभियंता,सर्व विभागाचे प्रमुख अभियंता, ठेकेदार यांची संयुक्त बैठक गुरुवार दि ३० में रोजी सकाळी ११ वाजता विद्युत वितरण च्या कार्यालयात रोजी आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये गावचे सरपंच,प़चायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गावातील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि ज्या नागरिकांच्या विद्यूत वितरण संदर्भात ज्या काही तक्रारी असतील त्यांनी आपले म्हणणे लेखी लेखी स्वरुपात घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे
या बैठकीला सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या मतदारसंघातील विद्युत वितरण चे अधिकारी,अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,शाखा अभियंता, ठेकेदार, उपस्थित राहणार असल्याने नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन,आम्ही सावंतवाडीकर च्या वतीने *माजी आमदार राजन तेली*,*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर*शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी*,*सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे*,*माजी नगरसेवक विलास जाधव* *सुरेश भोगटे*,*आनंद नेवगी* , यांनी केले आहे.
विद्यूत वितरण कंपनी चे ठेकेदार मुजोर झाले आहेत, अवकाळी पावसातच संपूर्ण मतदारसंघ अंधारात राहतो ,जिवीत हानी होते तर पुढे काय?असा प्रश्न उपस्थित होतो,या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा, पुन्हा अधिकाऱ्यांची हिंमत होता कामा नये उद्धटपणे वागण्याची ..बेजबाबदार उत्तर देण्याची ..त्यामुळे संघटित होणे ही काळाची गरज आहे ..राजकीय कवच कुंडले बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे व आपली बाजू मांडावी असे आवाहन करण्यात आले आहे