You are currently viewing भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार

*भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार*

वेंगुर्ले

दरवर्षी प्रमाणे भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो . यावर्षीही तालुक्यात प्रथम आलेली अर्पिता सामंत व द्वितीय आलेली गायत्री बागलकर यांचा सत्कार परुळे विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन केला . तसेच वेंगुर्ले तालुक्यात तृतीय आलेली वेंगुर्ले हायस्कूल ची विद्यार्थींनी कु.प्रतिक्षा अशोक आरोलकर , तालुक्यात सहावी आलेली वेंगुर्ले हायस्कूल ची विद्यार्थीनी कु.दुर्वा संदिप परब व तालुक्यात दहावी आलेली न्यु इंग्लिश स्कूल उभादांडा ची कु.श्रृती श्रीधर शेवडे या तिनही विद्यार्थिनींचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला .
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ९९.७१ % निकाल हा वेंगुर्ले तालुक्याचा लागला , तसेच तालुक्यातील १९ पैकी १७ हायस्कूल चा निकाल १०० % लागला . तसेच ७०८ विद्यार्थांपैकी ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्तेत यावर्षीही मुलींनीच बाजी मारली .
लवकरच भाजपा च्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावीच्या प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थांचा सत्कार , तसेच १०० % निकाल देणाऱ्या हायस्कूल च्या मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे .
भाजपा च्या वतिने घरी जाऊन करण्यात आलेल्या सत्कारामुळे पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच विद्यार्थांना कौतुकाची थाप दिल्यामुळे भविष्यात यापेक्षा जास्त गुण मिळविण्याची ईर्शा निर्माण झाली .
या सत्कार समारंभाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व भुषण सारंग , मारुती दोडाणशट्टी , संभाजी सावंत , अशोक आरोलकर , संतोष सावंत , संदिप परब इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

https://sanwadmedia.com/136519/

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा