स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार -दिपक केसरकर
सावंतवाडी
बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही कोकण विभाग
अव्वल स्थानी कायम राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा टक्केवारीत महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. दहावी, बारावीनंतर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार आहे. गेली तेरा वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अव्वल येत असेल तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यासाठी माझा प्रयत्न राहील असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल स्थानी कायम राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा टक्केवारीत महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचा निकाल देखील चांगला लागला. सर्वच जिल्ह्यांच अभिनंदन करताना सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. त्यांनी आपला लौकिक कायम ठेवला आहे. त्यासाठी इथले शिक्षक, संस्थाचालक यांच विशेष अभिनंदन करतो. इथल्या संस्था ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून उभ्या केलेल्या आहेत. यावेळी आपली टक्केवारी देखील वाढली आहे. दिव्यांग मुलांचही विशेष कौतुक आहे. ९३ टक्के निकाल त्यांचा लागला आहे. सर्वांच करावं तेवढं कौतुक थोडं आहे. कॉपीमुक्त चळवळ आम्ही राज्यात राबविली. त्यामुळे मुलं अभ्यास करू लागली असून लागलेला निकाल हे त्याचं फलीत आहे असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तर दहावी, बारावी नंतर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलां चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष
चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार आहे. गेली तेरा वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अव्वल येत असेल तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यासाठी माझा प्रयत्न राहील असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. यावेळी रूपेश पावसकर उपस्थित होते.