*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गझल रचना*
बरी वाटली ( पादाकुलक )
एक जराशी बरी वाटली
डाय लावता खरी वाटली
उलटून गेले वय तरी ही
गोड हासता परी वाटली
दुरून थोडे पाहू जाता
बालपणीची शरी वाटली
निळेशार ते डोळे कसले
धारदार ती अरी वाटली
फटाकडेसे रूप जसे कीं
झणझणीतशी करी वाटली
थोपवले मी स्वतःसं थोडे
घरी न्यायला जरी वाटली
टोमण्या मध्ये चतुर इतकी
खात्रीने पुणेरी वाटली
श्रीनिवास गडकरी
बावधन पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित