*कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वेंगुर्लेत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न*
*आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मतदारांचा आढावा घेतला* .
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर भाजपाची सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील दोडामार्ग , सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्याच्या प्रचार नियोजन बैठका घेण्यात आल्या .
वेंगुर्ले तालुक्याची बैठक भाजपा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी आमदार निरंजन डावखरे , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे मान्यवर म्हणून उपस्थित होते .
यावेळी सर्वप्रथम तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी तालुक्यातील पदवीधर मतदारांचा आढावा सांगीतला , तसेच गावनिहाय पहील्या टप्प्यातील निवडणूक यंत्रणेची माहीती दिली .
यावेळी या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर , आमदार निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन करुन मतदारांपर्यंत चार टप्प्यात संपर्क करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्याबाबत मार्गदर्शन केले .
यावेळी भाजपाचे कामगार नेते प्रकाश रेगे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तसेच मठ उपसरपंच बंटी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप ,तालुका संयोजक प्रशांत खानोलकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर ,जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , महीला अध्यक्षा सुजाता पडवळ ,सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब ,जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे , युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर – प्रणव वायंगणकर – समीर नाईक – हेमंत गावडे – नारायण कुंभार – प्रशांत बोवलेकर , मठ उपसरपंच बंटी गावडे , शिरोडा संयोजक मनोज उगवेकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर – गणेश गावडे – सुनिल चव्हाण , ता.चिटणीस समीर कुडाळकर व नितीन चव्हाण , होडावडा उपसरपंच राजबा सावंत , महीला मोर्चाच्या प्राजक्ता पाटकर , भुषण सारंग , रफीक शेख , नगरसेवक प्रशांत आपटे , बुथ अध्यक्ष बाळु वस्त , प्रमोद वेर्णेकर इत्यादी उपस्थित होते .
बैठकीचे सूत्रसंचालन प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन सुहास गवंडळकर यांनी केले .