You are currently viewing कुडाळ हायस्कूल दहावीचा 100 टक्के निकाल

कुडाळ हायस्कूल दहावीचा 100 टक्के निकाल

कुडाळ :

 

कुडाळ हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घवघवीत यश संपादन करत 100 % निकाल मिळवला आहे. यात परिश प्रसाद कुबल 98.60% प्रथम क्रमांक, आर्या संतोष चिपकर 96% द्वितीय क्रमांक, अंकिता अविनाश घाटगे 95.20% तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. तसेच सौमित्र विश्वास मंडले 95%, हर्ष प्रसाद परब 95% मधुरा दत्तात्रय जडगे 93.80% यांनी गुण प्राप्त केले आहे.

दहावीच्या परीक्षेस कुडाळ हायस्कूल चे 187 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला आहे. विशेष प्राविण्य म्हणजे 105 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. तर प्रथम श्रेणीत 56 विद्यार्थी आणि 60 टक्के पेक्षा कमी गुण मिळविणारे 26 विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे संस्कृत विषयात दहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक,शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा