*सावंतवाडी तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.५२ टक्के*
कळसुलकरची वेदिका ताटे ९८.४० टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम
कळसूलकरचा यज्ञेश सावंत ९८ टक्के गुणांसह द्वितीय
तर बांदा खेमराजचे चैतन्य बांदेकर व राज वीर ९७.६० टक्के गुणांसह तृतीय
तब्बल ३९ शाळांचा १०० टक्के निकाल
सावंतवाडी
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९.५२ टक्के लागला आहे. तालुक्यातून कळसुलकर इंग्लिश स्कूलची वेदिका ताटे हीने ९८.४० टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या यज्ञेश सावंत याने ९८ टक्के गुणांसह तर बांदा खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या चैतन्य बांदेकर व राज वीर यांनी ९७.६० टक्के गुणांसह तालुक्यात तृतीय येण्याचा मान मिळवला. तर मिलाग्रीस हायस्कूलची मानसी राणे ९७. ४० टक्के, कळसुलकरचा राजेश गुडेकर ९७.२०, आरोस विद्या विकासची श्रेया नाईक ९६.२० व नेमळे हायस्कूलची प्रणया राऊळ यांनी ९६ टक्के गुणांसह विशेष प्राविण्य मिळवले. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १६८७ विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी १६७९ उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३९ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.यामध्ये ८५९ जणांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. प्रथम श्रेणीत ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत १६१ तर तृतीय श्रेणीत २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्याचा शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे –
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात प्रशालेतून सिद्धी बबन राऊळ ९१.५० टक्के गुण मिळवित प्रथम तर द्वितीय कृणाल प्रशांत हरमलकर ९१.६० टक्के तर तृतीय पवित्र हेमंत मसुरकर व वेदा विश्वेश्वर कोळंबेकर ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत.
सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात इंग्लिश माध्यमातून मानसी राणे ९७.४० प्रथम, रूद्रांगी सावंत ९७.२० द्वितीय तर निधी साटेलकर ९६.४० तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा निकाल ९६.०५ टक्के लागला. यात वेदिका संजय तारे ९८.४० टक्के गुणांसह प्रशालेत व तालुक्यात प्रथम, सावंत यज्ञेश यशवंत ९८ टक्के तर गुडेकर विठ्ठल राजेश ९७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. सलग दहाव्या वर्षी निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक निशा चौधरी ९३.२० टक्के, द्वितीय अथर्व जाधव ९१ टक्के तर तृतीय श्रेष्ठा भुसानावर ९०.८० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडीने यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १०० टक्के यश मिळवले. कु. सावंत सोहम सचिन याने ९४ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम तर कु. नंदेश्वर हर्षल राजेश याने ९३.४० टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय तर कु. कांबळी सिद्धी संदीप हिने ९०.२० टक्के गुण पटकावुन तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम साहिल कांदळगावकर ७६.८० टक्के, द्वितीय नितीन गौड ७४.२ तर तृतीय पांडुरंग मुलीमनी ५७.४० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.
सावंतवाडी सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा १०० टक्के निकाल लागला. यात आमना गवंडी ९४.६० टक्के प्रथम, सैद बेग ९१ टक्के द्वितीय तर प्रविण सैनी ९०.४० तृतीय क्रमांक प्राप्त केला. रय्यान पटेल ८९.८० व आर्या आळवे ८९.२० अनुक्रमे चतुर्थ व पंचम क्रमांक प्राप्त केला.
सावंतवाडी सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडीतून बेग अमारा परवेझ ९२.४० टक्के प्रथम, शेख अफिफा जमीर द्वितीय ८५. ४० टक्के तर तृतीय जरी आफिया इरफान ८४.४० टक्के गुण प्राप्त केले.
श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.५६ टक्के एवढा लागला आहे. यात मधुरा सावंत ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम, सोमदत्त भोगण ९२ टक्के द्वितीय तर लोकेश भोगण ९०.६० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे या हायस्कूल चा दहावी शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के येवढा लागला यामध्ये श्रद्धा संतोष चिले हिने ९४.६० टक्के गुणांसह प्रशालेतून प्रथम क्रमांक मिळविला तर प्रणाली आनंद परब ९१.६०टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक तर , कुंदन नवीन भराडी याने ९०टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
आरोंदा प्रशालेच्या एस एस सी निकाल ९५ टक्के एवढा लागला आहे. प्रथम गुरुनाथ उमेश तारी ८४.६० टक्के, द्वितीय राठोड प्रणित ताराचंद ८३.२० टक्के व तृतीय नयबागकर प्रणव नारायण ८०.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्रशालेत प्राप्त केला.
आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय, कुणकेरीचा निकाल ९५ टक्के लागला. अमोल दिगंबर दळवी ८९.४० टक्के प्रथम, रिया रमेश पाटील ८६ टक्के द्वितीय तर रितेश रमेश झोरे ८५.२० तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने दहावी परिक्षेत सलग १६ वर्षे सातत्यपूर्ण १०० टक्के निकाल लावत शैक्षणिक उत्कृष्टतेचे दैदीप्यमान प्रदर्शन घडविले आहे. यशवंत विद्यार्थ्यांमध्ये कॅडेट गिरीराज बाळकृष्ण मुंडले ९० टक्के प्रथम, कॅडेट सोहम राजेश बोऱ्हाडे ८९.८० टक्के द्वितीय, कॅडेट रितेश रत्नकांत हरमलकर .८९ टक्के तृतीय क्रमांक मिळविला.
आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस विद्यालयाचा एकत्रित निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक कुमारी श्रेया भरत नाईक ९६.२० टक्के, द्वितीय क्रमांक शरयू देवेंद्र कुबल ९४ टक्के तृतीय क्रमांक कुमारी कृपाली नवसो पेडणेकर ९१.२० टक्के एवढा लागला.
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे शाळेचा दहावी २०२३ -२४ चा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम . प्रणया परशुराम राऊळ ९६ टक्के, द्वितीय काजल राजाराम घोंगे ९४.४० टक्के तर तृतीय कुआर्यन अरविंद गोवेकर ९२.६० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.
माध्यमिक विद्यालय माडखोलचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम श्वेता सखाराम तायशेटे ८५ टक्के, व्दितीय निविधा दिलीप परब ८३ टक्के तर तृतीय राहूल सुजित देसाई ८१ टक्के गुण मिळवून प्राप्त केला.
मळगाव हायस्कूल मळगावचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून एकूण १०० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यात सीया नामदेव नाटेकर ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय पूजा बिरो कोळेकर ९२.८० टक्के तर तृतीय निलेश जयवंत मेस्त्री ९०.८० टक्के तसेच चतुर्थ समृद्धी कृष्णा गवस व कोमल कमलेश दळवी ९०.४० टक्के प्राप्त केलेत.
श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय असनीये या विद्यालयाचा या वर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १००टक्के येवढा लागला. यात सायली शिवा गावकर हिने ८७.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला तर समृद्धी नामदेव गावडे ८५टक्के गुणांसह व्दितीय तर स्नेहल संजय गावडे ८१.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
कोलगाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९३. ७५ टक्के लागला. प्रथम प्रतिक्षा दिलीप ठाकूर ८६.८० टक्के, द्वितीय श्रमिका कदम ८३ टक्के, तृतीय सारिका धुरी ८२.८० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.
विद्या विहार आजगावचा निकाल १०० टक्के लागला. जान्हवी मुळीक ९१.४० टक्के प्रथम, तेजल गावडे ८९.२० द्वितीय तर अदिती राज्याध्यक्ष ८८.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल मळेवाड ता. सावंतवाडीचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम मंगल देवदास मुळीक ८८ टक्के , कु. मंजुषा सतीश केरकर ८७ टक्के तर . तन्वी महेश मुळीक ८३.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कलंबिस्त संचलित कलांबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतून संकेत कृष्णा जाधव हा ९० टक्के गुणांसह प्रथम, अमृता अरविंद पास्ते ८७.४० टक्के गुणांसह द्वितीय तर तन्वी दशरथ पास्ते ही ८५.४० टक्के गुणांसह तृतीय आली आहे.
माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेलीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात काजल सावंत प्रथम ९० टक्के, सुहानी सनाम द्वितीय ८४.२१ टक्के तर कृतिका सावंत ८३. २० गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
माऊली माध्यमिक विद्यालय, सोनूर्लीची सानिका राजेंद्र गावकर हीन ८६.४० टक्के गुण मिळवून प्रथम, पूजा आणा गावकर ८१.६० टक्के द्वितीय, तर तृतीय चैताली दशरथ साळगावकर ८०.८० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.
विद्या विहार कनिष्ठ विद्यालय आरोसची धनश्री मोरजकर ८९ टक्के प्रथम, मयुरी आरोसकर ८७.८० द्वितीय तर हर्षदा नाईक ८१.८० तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय दाणोलीचा निकाल १०० टक्के लागला. रिमा गुरुनाथ ढवळे ८७.८० टक्के गुण मिळवत विद्यालयलाई प्रथम क्रमांक मिळवला. कु. रोशनी दशरथ कोकरे ८७.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात द्वितीय व कु. देवयानी संजय सावंत ८५.६० टक्के गुण मिळवन विद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
श्री जनता विद्यालय तळवडेचा निकाल ९८.४१ टक्के एवढा लागला. यात श्रेया कावळे ९३.२० प्रथम, द्वितीय प्रियांका भागवत ९१.८० द्वितीय तर रिया पेडणेकर ९१ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल निरवडेतून मॉरिस्का डायस ९१ टक्के प्रथम, द्वितीय किर्ती गावडे ८६.२० द्वितीय तर तृतीय क्रमांक सोहम गुरव ७९.२० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.
चौकूळ इंग्लिश स्कूल, चौकूळ, सावंतवाडीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम भूमी आनंद परब ८९.९० टक्के, ऐर्श्वया संतोष गावडे ८९.६० द्वितीय तर. रिया सुरेश शेटवे ८७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विलवडे ग्रामोन्नती मंडळ संचलित राजा शिवाजी विद्यालय विलवडे या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून,परीक्षेसाठी ४१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात कुमारी. समिक्षा एकनाथ गावडे ९५ टक्के हीने प्रथम क्रमांक, तर ९४.४० टक्के गुणांसह द्वितीय पूर्वा उत्तम दळवी तर तृतीय क्रमांक गायत्री कालिदास दळवी ९२ टक्के गुणांसह मिळविला.
विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल १०० टक्के लागला असून गौरवी आनंद कोठावळे हिने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. अच्युत चंद्रकांत पालव याने ८३.२० टक्के द्वितीय क्रमांक, गायत्री जयराम पालव हिने ८३ टक्के तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कु.लतिका वासुदेव नाईक हिने ८०.८० टक्के चतुर्थ क्रमांक,कु.दिव्या अनिल कोठावळे हिने ८०.२० टक्के पंचम क्रमांक मिळविला आहे.
श्री माऊली विद्यामंदिर डोंगरपाल शालांत परीक्षा मार्च २०२४ प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये प्रशालेतून प्रथम देविता रमेश केळूसकर ९४.२० टक्के, द्वितीय नूतन नागेश कुबल ९३.९० टक्के तृतीय कु.आर्या लवू सावंत ९१.४० टक्के यांनी यश संपादन केले.
बांदा : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल १०० टक्के इतका लागला आहे. प्रशालेतून चैतन्य सुहास बांदेकर व राज जीवबा वीर ९७.६० टक्के मिळवून दोघांचा विभागून प्रथम, सुयश सुनील राठोड ९७.२० टक्के दृतीय व चिन्मय शांताराम असणकर ९५.८० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकवीला आहे.
बांदा : दिव्या ज्योती स्कूल डेगवे प्रशाळेचा दहावीचा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १०० टक्के निकाल लागला. सलग चौथ्या वर्षी प्रशाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. उद्धव गोपाळ परब याने ९२ टक्के गुण मिळवत प्रशाळेतून प्रथम, तर अर्जुन प्रवीण कोरगावकर याने ९१ टक्के मिळवत द्वितीय तर चिराग संजय पाटील याने ९०.८० गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
बांदा : मुंबईच्या न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. मानस समीर कोलते हा ९६.९८ टक्के गुण मिळवून पहिला आला तर ऋतुजा नाईक ही ९५.६० टक्के गुण मिळवून द्वितीय आणि विनीत रवींद्र पंडित हा ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीया आला.
बांदा : मुंबईच्या न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. मानस समीर कोलते हा ९६.९८ टक्के गुण मिळवून पहिला आला तर ऋतुजा नाईक ही ९५.६० टक्के गुण मिळवून द्वितीय आणि विनीत रवींद्र पंडित हा ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीयाला सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.