राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल शंभर टक्के
सिद्धी बबन राऊळ ९१.५ टक्के गुण मिळवून प्रथम
सावंतवाडी
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण १२६ पैकी १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतून प्रथम सिद्धी बबन राऊळ ९१.५ टक्के तर द्वितीय कृणाल प्रशांत हरमलकर ९१.६०टक्के तर तृतीय पवित्र हेमंत मसुरकर ९१.४० टक्के व वेदा विश्वेश्वर कोळंबेकर ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत. या शाळेत एकूण ११ विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सी. एल नाईक, डॉ दिनेश नागवेकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड आदींनी केले आहे.
मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी यशस्वी
—————————–
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडीने यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के यश संपादन करत शंभर निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा स्कूल मध्ये कु. सोहम सचिन सावंत याने ९४ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम तर कु. हर्षल राजेश नंदेश्वर याने ९३.४० टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय तर कु. सिद्धी संदीप कांबळी हिने ९०.२० टक्के गुण पटकावुन तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत . तसेच कु, प्रगती राजेंद्र सैनी ८९ टक्के ,कु. शुभम सिताराम रेगर ८८.८० टक्के गुण प्राप्त करत यांनी देखील उज्ज्वल यश संपादीत केले.
यशस्वी विद्यार्थ्यांनी जिल्हा. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री. खेमसावंत भोसले, सौ. शुभादादेवी सावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्री. लखम सावंत भोंसले, युवराजनी श्रद्धाराजे सावंत भोंसले व मंडळाचे संचालक तसेच मुख्याध्यापिका श्रीमती. अनुजा साळगावकर. तसेच शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारिणी सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माजगाव हायस्कूल चे यशस्वी विद्यार्थी
माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९७.५६ टक्के लागला आहे. या परीक्षेला बसलेल्या ४१ पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक मधुरा मिलिंद सावंत ९४.८० टक्के, द्वितीय क्रमांक सोमदत्त प्रमोद भोगण, ९२ टक्के तृतीय क्रमांक लोकेश रामदास भोगण ९०.६० टक्के या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ८ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सिए लक्ष्मण नाईक, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिक भाऊसाहेब चौरे, इतर शिक्षक व कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.
कलंबिस्त हायस्कूल चे यशस्वी विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कलंबिस्त संचलित , कलांबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतून संकेत कृष्णा जाधव हा ९० टक्के गुणांसह प्रथम, अमृता अरविंद पास्ते ८७.४० टक्के गुणांसह द्वितीय तर तन्वी दशरथ पास्ते ही ८५.४० टक्के गुणांसह तृतीय आली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.