डॉन बॉस्को हायस्कूलचा निकाल या वर्षीही १०० टक्के
अथर्व बोर्डवेकर प्रथम..
ओरोस
सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बोस्को हायस्कूल प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल सलग २२ व्या वर्षी १०० टक्के लागला आहे. प्रशालेतील अथर्व मिलिंद बोर्डवेकर या विद्यार्थ्याने ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
प्रशाळेतून एकूण १०८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. यातील ७५ टक्के पेक्षा जास्त गुण ८३ विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. फर्स्ट क्लास २३ विद्यार्थ्यांनी मिळविला असून २ विद्यार्थ्यांना सेकंड क्लास मिळाला आहे. अथर्व बोर्डवेकर ९७.६० टक्के गुण मिळवत प्रत आला असून दुसरा क्रमांक अनुष्का उमेश देसाई आणि स्मरण विनम्र तारी यांनी ९७ टक्के गुण मिळवत मिळविला आहे. तिसरा क्रमांक ओमकार मधुकर परब यांनी ९५.६० टक्के गुण मिळवीत पटकाविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर सविओ गोम्स, उपमुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव, संस्थेचे मॅनेजर फादर पॉल डिसोझा तसेच फादर फ्रान्सीस झेविएर अभिनंदन केले आहे.