*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जीवन*
पाणी जीवन जीवन
पाणी पावन पावन
पाणी पाऊस पाऊस
पाणी आषाढ श्रावण
रोप इवलाले पाणी
पाणी खळाळती गाणी
पाणी दाटलेले पीक
करी पाणी आबादानी
जसे पाणी हे जीवन
तसे जीवन हे पाणी
नको तुंबणे तयाला
वाहू द्यावे झऱ्यावाणी
बाग जीवनाची मग
येऊ द्यावी बहराला
राबराबून मातीत
अर्थ द्यावा जगण्याला
अनुपमा जाधव
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७