You are currently viewing आकेरी घाटीत बोलेरो पिकअप टेम्पो पलटी

आकेरी घाटीत बोलेरो पिकअप टेम्पो पलटी

आकेरी घाटीत बोलेरो पिकअप टेम्पो पलटी

सावंतवाडी:

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बोलेरो पिकअप टेम्पो पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजताचा सुमारास घडला.
या बाबत आधिक माहिती अशी की, सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने हा बोलेरो पिक-अप टेम्पो जात होता. आकेरी घाटी काढल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी असलेल्या गटारात पलटी झाला. अपघातानंतर गाडीत असलेल्या गुरांचा खाद्याचा पिशव्या (पोती) रस्त्यावर पडल्या. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा