You are currently viewing बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून नोंदणी…

बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून नोंदणी…

बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून नोंदणी…

जुलै-ऑगस्‍ट २०२४ मध्ये परीक्षा

इयत्ता बारावीच्‍या पुरवणी परीक्षेचे आयोजन जुलै-ऑगस्‍टमध्ये केले जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांना नोंदणीची प्रक्रिया सोमवार (ता.२७) पासून सुरु होणार आहे.

नुकताच जाहीर निकालात अनुत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत इच्‍छुक विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. मंगळवारी (ता.२१) इयत्ता बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्‍या विद्यार्थ्यांचे वर्ष वया जाऊ नये, यासाठी जुलै-ऑगस्‍टमध्ये पुरवणी परीक्षेचे आयोजन करताना विद्यार्थ्यांना संधी उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. तसेच बारावीच्‍या परीक्षेत गुणांमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेंतर्गत परीक्षा देण्याची संधी उपलब्‍ध असणार आहे.

जुलै-ऑगस्‍ट २०२४ परीक्षा तसेच फेब्रुवारी-मार्च २०२५ अशा दोन संधी श्रेणी सुधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असतील. दरम्‍यान जुलै-ऑगस्‍टमध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन आवेदनपत्रे दाखल करावी लागणार आहेत.

अर्जाचे वेळापत्रक

* नियमित शुल्‍कासह ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणे : २७ मे ते ७ जून

* विलंब शुल्‍कासह ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणे : ८ ते १२ जून

* शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे शुल्‍क भरणे : ३१ मे ते १५ जून

* शाळा, महाविद्यालयांनी मंडळाकडे शुल्‍क भरल्‍याचे चलन, यादी जमा करणे : १८ जूनपर्यंत.

प्रतिक्रिया व्यक्त करा