You are currently viewing महिलांनी निर्माण केलेल्या काजू उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणार

महिलांनी निर्माण केलेल्या काजू उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणार

महिलांनी निर्माण केलेल्या काजू उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणार !

सौ.अर्चनाताई घारे यांनी जिजाऊ काजू प्रक्रिया युनिटला दिली‌ भेट

सावंतवाडी

आरोंदा येथील सामाईक सुविधा केंद्र अंतर्गत जिजाऊ काजू प्रक्रिया युनिटला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी भेट देत केंद्राच्या महिला भगिनींसह संवाद साधला. त्यांच्याकडून काजू प्रक्रिया युनिटच्या कामाची माहीती यावेळी घेतली. महिलांनी तयार केलेल्या या उत्पादनाला राज्यातील मोठ्या बाजारपेठांमध्ये स्थान देण्यासाठी संसदरत्न खासदार आदरणीय सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याची भावना अर्चना घारे यांनी यावेळी व्यक्त केली. सावंतवाडी आरोंदा येथे नऊ प्रभाग संघांनी मिळून हा प्रकल्प उभारला आहे. महिला बचतगट उमेद अभिमान अंतर्गत तो कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिलेच असे हे युनिट महिलांनी उभारले आहे. याद्वारे शेतकऱ्यांचा काजू बाजारभावापेक्षा जास्त भावाने खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. निरनिराळ्या चवींचे काजू या महिला तयार करत आहेत. विश्वदा विजय गोवेकर, स्वाती सुभाष नाईक, रेणुका नंदकिशोर नाईक, रसिका राजेश नाईक, निकीता नंदकिशोर काणेकर आदी महिला सामाईक सुविधा केंद्र अंतर्गत जिजाऊ काजू प्रक्रिया युनिट चालवत आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी या प्रकल्पाला भेट देत महिलांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.सौ. अर्चनाताई म्हणाल्या, महिलांनी पुढाकार घेत काजू प्रक्रिया युनिट उभारले आहे. महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. जिजाऊंच्या या लेकी बचत गटांच्या सहाय्याने काजू प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांना राज्यात मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी माझे विशेष प्रयत्न असणार आहेत. मुंबई वाशी मार्केट, पुणे येथील मॉलमध्ये या महिलांनी तयार केलेल्या काजू उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचा माझा मानस आहे. यासाठी संसदरत्न खासदार आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे यांचे सहकार्य आपण घेणार आहे अशी भावना सौ.अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत टेकनोसो एनजीओचे सिनीअर मॅनेजर विक्रम दाहिया, नंदकिशोर नाईक यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आरोंदा अध्यक्षा माजी सरपंच उमा बुडे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्षा सौ.नितीशा नाईक, युवती अध्यक्षा सौ.सावली पाटकर, विद्यार्थी अध्यक्ष श्री.ऋतिक परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा