You are currently viewing मामाच्या गावाला…

मामाच्या गावाला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मामाच्या गावाला…*

 

झुकूझुकू झुकूझुकू आगीनगाडी

भरभर भर पळते झाडी

नवीन झाडे लावू या…

मामाच्या गावाला जाऊ या…॥धृ॥

 

गाव झाला ओसाड, ना आमराई ना पाड

बांधावर कोया लावू या.. मामाच्या…॥१॥

 

जिकडे तिकडे कॅांक्रिट, त्यामुळे वाढे हीट

कोयांना पाणी घालू या.. मामाच्या.. ॥२॥

 

झाडेच झाडे लावा हो,गावाची वाढेल शोभा हो

रिमझिम पाऊस पाहू या..मामाच्या …॥३॥

 

गाव होईल मग सुंदर,पाड पिकतील भरभर

पोटभर आंबे खाऊ या.. मामाच्या….॥४॥

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा