You are currently viewing विद्यूत वितरण कार्यालयावर सावंतवाडीकरांची धडक…

विद्यूत वितरण कार्यालयावर सावंतवाडीकरांची धडक…

विद्यूत वितरण कार्यालयावर सावंतवाडीकरांची धडक…

अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,सर्व शाखाधिकारी, ठेकेदार व ग्राहक यांची एकत्रित बैठक लावण्याचे कबूल केल्यानंतर आंदोलन मागे..

सावंतवाडी
अवकाळी पावसात सावंतवाडी तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने संतप्त नागरिकांनी आम्ही सावंतवाडीकर या नावाखाली एकत्र येत आज उपकार्यकारी अभियंता कुमार हिंदुराव चव्हाण यांना घेरावा घालून जाब विचारला विद्युत वितरण चे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, ठेकेदार व सर्व कर्मचारी यांची एकत्रित बैठक 30 मे रोजी लावण्याचे अधिक्षक अभियंता यांनी कबूल केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोगटे राजू बेग , दिपाली सावंत,संजू शिरोडकर अभय पंडित बाबल्या दुभाषी, दत्ता सावंत नितीन गावडे ,मनसेचे गुरुदास गवंडे बंड्या तोरसेकर ,तारक सावंत राजू तावडे ,आप्पा गावडे, सुदर्शन सावंत, दिनेश काळे, विजय देसाई ,प्रशांत सामंत राजू शिरोडकर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पावसाळ्यापूर्वी तुम्ही कोणती उपाययोजना केली याची माहिती द्या असे सांगून अधिकाऱ्यांना धारेवर धरले ,लाईट बंद झाल्यावर तुमचे अधिकारी फोन बंद करून ठेवतात, फोन उचलत नाही अशा तक्रारी मांडल्या या तक्रारीवर उपकार्यकारी अभियंता हिंदुराव चव्हाण निरुत्तर झालेत जनतेचा उद्रेक होण्याची आपण वाट पाहत आहात असा आरोप यावेळी बोलताना साळगावकर यांनी केला.
सिताराम गावडे यांनी पावसाळ्यापूर्वी अगोदर तीन महिने तुम्ही विद्युत वाहिन्यांवरील धोकादायक झाडे का तोडत नाही असा सवाल उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमच्याकडे वीज चोरी वीज गळती होत नसताना आमच्यावर अधिकचा भार लादला जात आहे ही तुमची ईस्ट इंडिया कंपनी आमची लुबाडणूक करण्यासाठी स्थापन झाली आहे असा आरोप करून यापुढे सर्वसामान्य जनतेला त्रास झाल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.
माजी आमदार राजन तेली यांनी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे नेमके कारणे कोणती त्यावर कोणती उपाययोजना केली ,आपल्याकडे मनुष्यबळ अपूर्ण आहे का? याबाबत आपण वरिष्ठांशी बोलला आहात का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले तर बबन साळकर यांनी आमदार दीपक केसरकर यांना 30 तारीख च्या बैठकीला बोलवू नका ते फुकटचे शायनिंग मारून जाणार असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
यावेळी विलास जाधव यांनी शिक्षण व मराठी भाषा मंत्री स्थानिक आमदार दिपक केसरकर यांनी पावसाळ्यापूर्वीची आठवा बैठक कधी घेतली या प्रश्नाचे उत्तर देताना ऑगस्ट २०२३ रोजी असे सांगतात सर्वजणांनी उग्र रूप धारण करत आता या वर्षी चा ऑगस्ट महिना आला तरी स्थानिक आमदार जागे झाले नाहीत का? असा सवाल केला,माजी नगरसेवक सुरेश भोगटे,अभय पंडित राजू बेग,बंड्या तोरसेकर यांनी उपकार्यकारी अभियंतांवर प्रश्नांची सरबत केली मात्र एकाही प्रश्नाचे योग्य उत्तर हिंदुराव चव्हाण देऊ शकले नाहीत, त्यामुळे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता ठेकेदार सर्व कर्मचारी यांची ग्राहकांसोबत एकत्रित बैठक 30 मे रोजी घेण्याचा शब्द अधीक्षक अभियंता यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा