You are currently viewing कंत्राटी वीज कामगारांची कुडाळला २५ मेपासून दोन दिवसीय बैठक –  जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

कंत्राटी वीज कामगारांची कुडाळला २५ मेपासून दोन दिवसीय बैठक –  जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

कंत्राटी वीज कामगारांची कुडाळला २५ मेपासून दोन दिवसीय बैठक –  जिल्हा अध्यक्ष आनंद लाड

कुडाळ

राज्यातील कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नासाठी व पुढील
आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केंद्रीय कार्यकारणी बैठक २५ मे पासून दोन दिवस कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील वासुदेवानंद हॉल येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी ही माहिती दिली.

निलेश खरात म्हणाले, राज्यातील सर्व वीज कामगार कंत्राटदार
व अधिकारी यांच्या संगनमतामुळे त्रस्त आहेत उपमुख्यमंत्री तथा
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचा अनादर प्रशासन सतत
करत आहे. लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता संपल्यावर
ऊर्जामंत्री यांनी संघटनेसमवेत पुन्हा बैठक घेऊन वीज कंत्राटी
कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा कामगार वर्गाकडून
आहे. या बैठकीला संघटनेचे सर्व केंद्रीय कार्यकारणी सदस्य,
३६ जिल्हाध्यक्ष, जिल्हासचिव, जिल्हा संघटन मंत्री व जिल्हा
कोषाध्यक्ष असे सुमारे १५० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष आनंद लाड यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा