You are currently viewing मन

मन

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन*

 

मन असतं विचित्र.

मन असतं विक्षिप्त.

मन असतं दयाळू.

मन असतं अलीप्त.

 

 

मन होतं फूल.

मन होतं पान.

मन होतं झाड.

मन होतं रानं.

 

 

मन होतं थेंब.

मन होतं सागर.

मन होतं रोपं.

मन होतं आगर.

 

 

मन कधी होतं

पाऊस धुंवाधार.

मन कधी वाजवतं

शीळ हळूवार.

 

 

मला मात्र मन

खंबीर हवं आहे.

वादळ वाऱ्यातही जे

भक्कम उभं राहे.

 

 

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा