You are currently viewing मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात लाखोंचे नुकसान

मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात लाखोंचे नुकसान

मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात लाखोंचे नुकसान

भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान…

बांदा

वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात आज हाहाकार माजवीला. शहरात ठिकठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शहरातील गाडगेवाडी येथील भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. विद्युत पोल उन्मळून पडल्याने शहरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. आज सायंकाळी एक तास मुसळधार पावसाने शहर व परिसराला झोडपून काढले. बहुतांश ठिकाणी वीज कोसळल्याने वीज उपकरणे निकामी झालीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा