रस्त्यालगतचे धोकादायक असलेले झाड तोडून घेणेबाबत….
माजी नगरसेवक राजू बेग यांचे सावंतवाडी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषद हद्दीमध्ये माठेवाडा काझिदिंडी परिसरात श्री. वागळे दुकानानजिक मुंबईस्थित श्री. महंमद रफिक काझी रा. जे.जे. हॉस्पिटल, भेंडी बाजार, व्ही. टी. स्टेशनजवळ, मुंबई नं. १ यांच्या मालकीच्या जागेतील एक आंब्याचे झाड मुळालगत अत्यंत जिर्ण झालेले आहे. सदरचे झाड रस्त्यालगत धोकादायक अवस्थेत असल्याने तात्काळ तोडून घेण्याबाबत तेथील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. नागरिकांच्या जिवितास धोका असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार मी संदर्भ क्र. १ च्या दिनांक १५/०६/२०२३ च्या अर्जाने नगरपरिषदेस कळविलेले होते. त्यानंतर झाडाचे मालक श्री. महंमद काझी यांस दिनांक ०३/०७/२०२३ च्या पत्राने नगरपरिषदेने कळविलेले होते.
परंतू अद्यापपर्यंत या झाडाबाबत कोणतीच उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. सदरचे झाड धोकादायक स्थितीत आहे. सदर रस्त्यावरुन बरीच रहदारी असल्याने अपघात होऊ शकतो. तसेच आता पावसाळा तोंडावर आल्याने झाड मोडून जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर झाड मोडून जिवित व वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्व नगरपरिषद जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
तरी सदर धोकादायक झाड तात्काळ तोडून घेऊन् रहदारीस / नागरिकांस होणारा संभाव्य धोका टाळावा अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेवक राजू बेग यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना दिले आहे.