किनळे जयभीम उत्कर्ष मंडळाचे ‘ महाधम्मरक्खिता’ सन २०२४चे पुरस्कार प्रदान.
दोडामार्ग
दिवंगत ल. रा.जाधव गुरुजी स्मृती प्रित्यर्थ त्यांचा परिवार व जयभीम उत्कर्ष मंडळ किनळे ,यांच्या वतीने देण्यात येणारा महाधम्मारक्खिता पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.यंदांचे पुरस्कार वितरणाचे हे तिसरे वर्ष आहे. किनळे येथे बुद्ध भीम संयुक्त जयंती दिनी नुकतेच हे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील धम्म चळवळीतील कार्यकर्ते आयु. एम. बी.कदम यांना ते करीत असलेल्या धम्म प्रसाराच्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्याचबरोबर , फोंडाघाट तालुका कणकवली येथील दिवंगत दामोदर गोपाळ जाधव यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला तर बाव, तालुका कुडाळ येथील दिवंगत वि.मो. बावकर यांना त्यांनी अनेक वर्ष धम्म चळवळीतील दिलेल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला.यावेळी त्यांनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.
ल रा जाधव गुरुजी यांच्या सावंतवाडी तालुक्यातील मूळ किनळे गावी मे बुध्द भीम जयंती दिनी या पुरस्कारांचे वितरण झाले .
विशेष म्हणजे १९६० रोजी वडाचा पाट येथे आयोजित धम्म दीक्षा सोहळ्यात उपस्थित असलेले आणि धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आयु मधुसूदन डांगमोडेकर यांना त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा आनंद जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य ए.डी.कांबळे ,भारतीय बौद्ध महासभा तालुका सावंतवाडीचे सचिव चंद्रशेखर जाधव, महिला अध्यक्ष मीनाक्षी तेंडोलकर, माजी अध्यक्ष प्रा.बी पी कांबळी सर ,वासुदेव जाधव संग्राम कासले, सत्कार मूर्ती यांचे कुटुंबीय, तालुका आणि जिल्हा प्रमुख पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थितीत होते.
पुरस्काराचे स्वरूप हे रोख रक्कम, शाल ,सन्मानपत्र व भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ असे होते.
जिल्ह्यात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तींना ,१००% बौद्धमय वस्तीला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ही आयोजित करण्यात आला होता.मान्यवरांनी जयभीम उत्कर्ष मंडळ किनळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.धम्म चळवळीतील देत असलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.हा सोहळा संपन्न करण्यासाठी मंडळाचे सहदेव जाधव,विजय जाधव, विनय जाधव प्रतीक जाधव अशोक जाधव अमित जाधव संदीप जाधव आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जाधव यांनी तर सूत्रसंचालन निशा जाधव ,प्रज्ञा जाधव यांनी केले आभार प्रदर्शन शंकर जाधव यांनी केले.