*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाही*
तनाला डोळे नाहीत
म्हणून काय बिघडले ?
मनाला डोळे तर
आहेत ना!
वाचा नाही म्हणून
बोलणे थांबेल का?
देहबोलीतूनही
सर्वकाही बोलता येतच ना !
हात नसले तरी
पायच हात होतात
आणि पाय नसले तरी
हातच पाय होतात
हात पाय
डोळे वाचा
सगळे जरी असले दिव्यांग
तरी पक्के
ध्यानात ठेवावे
मन असते
सदैव अभंग !
*अनुपमा जाधव*
*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*