You are currently viewing टाळीचे शास्त्र

टाळीचे शास्त्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सदस्य लेखक कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*टाळीचे शास्त्र*

 

हस्त सर्वोत्तम केंद्र

आरोग्याचे सार सूत्र |

तळहातावरी बिंदू

तनारोग्य कळसूत्र ||१||

दोन तीन मिनिटे ती

जे जे टाळी वाजविती

कथितो टाळीचे शास्त्र

आरोग्या आरोग्यशास्त्र ||२||

कार्यक्रमे टाळी देता

दुहेरी फायदा आहे |

टाळी वाजवावी स्पष्ट

प्रेरणा मिळते आहे ||३||

टाळीतून आनंद हा

कलाकारा प्राप्त छान |

टाळी वादकाचे काय

रक्ताभिसरण छान ||४||

टाळी संगीत आंनद

ताल रक्षक महान |

दोन हाता बोटे दहा

मात्रा घेई त्या मोजून ||५||

ऐसे महात्म्य टाळीचे

जाणुनी श्रोतेजन हो |

टाळी वाजवावी छान

अलौकिक श्रोते अहो ||६||

 

कवी :- सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला, जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा