You are currently viewing श्री श्री वामनाश्रम महास्वामी उद्या २३ मे रोजी सावंतवाडीत

श्री श्री वामनाश्रम महास्वामी उद्या २३ मे रोजी सावंतवाडीत

श्री श्री वामनाश्रम महास्वामी २३ मे रोजी सावंतवाडीत

सावंतवाडी

वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामी काशीमठ पुनःनिर्माणसाठी गुरुवार दि. २३ मे रोजी सावंतवाडीत दाखल होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गांवात जाऊन आर्शीवचन सभा घेऊन जनजागृती निर्माण करणार आहेत. त्या सभेस सर्वांनी उपस्थित राहून कृपाशीर्वादास प्राप्त व्हावे असे आवाहन वैश्य गुरुसेवा समिती, सिंधुदुर्ग तर्फे करण्यात आले आहे.

श्री श्री वामनाश्रम महास्वामी यांचा नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-बुधवार दि. २२ मे रोजी दोडामार्ग (सिंधुदुर्ग) येथे श्री. मोहन मणेरीकर यांच्या घरी सायंकाळी ७.०० वाजता आर्शीवचन, फलमंत्राक्षता, चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा. गुरुवार दि.२३ मे रोजी दुपारी १.०० वाजता घोटगेवाडी, विठ्ठल मंदिर येथे आर्शीवचन, फलमंत्राक्षता. संध्याकाळी ७.०० वाजता सावंतवाडी वैश्य भवन हॉलमध्ये आर्शीवचन, फलमंत्राक्षता, रात्रौ. ९.०० वाजता श्री. रमेश भाट यांच्या घरी चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा. शुक्रवार दि. २४ मे २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आरोंदा, ता. सावंतवाडी येथे प्रदिप तानावडे यांच्या घरी आर्शीवचन, फलमंत्राक्षता. संध्याकाळी ७.०० वाजता कुडाळ येथे महालक्ष्मी हॉलमध्ये चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा. शनिवार दि. २५ मे २०२४ रोजी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे दुपारी १२.०० वाजता आर्शीवचन, फलमंत्राक्षता कार्यक्रम, संध्याकाळी ७.०० वाजता वैश्य गुरुमठ, शाखा – उंडील, ता. देवगड येथे रात्री चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा, रविवार दि. २६ मे २०२४ रोजी वैश्य गुरुमंदिर, शाखा उंडील प्रथम वर्धापन दिन कार्यक्रम दुपारी १२.०० वाजता आर्शीवचन, फलमंत्राक्षता. संध्याकाळी ७.०० वाजता चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा. अशाप्रकारचा श्री श्री वामनाश्रम स्वामींचा कार्यक्रम असणार आहे, असे रमेश बोंद्रे यांनी कळविले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा