You are currently viewing आरपीडीचा राहूल गावडे ९२.८३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम

आरपीडीचा राहूल गावडे ९२.८३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम

आरपीडीचा राहूल गावडे ९२.८३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम

आरपीडीचीच वैष्णवी भांगले ९२.५० गुण मिळवित द्वितीय तर बांदा खेमराजची रिद्धी तळगांवकर ९१.८३ टक्के गुणांसह तृतीय

सावंतवाडी

उच्च माध्यमिक शालांत परिक्षा २०२४ अर्थात बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या १७०५ विद्यार्थ्यांपैकी १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आरपीडीचा राहूल गावडे ९२.८३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आरपीडीचीच वैष्णवी भांगले ९२.५० गुण मिळवित द्वितीय तर बांदा खेमराजची विद्यार्थिनी रिद्धी तळगांवकर ९१.८३ टक्के गुणांसह तृतीय ठरली. तर मिलाग्रीसच्या सना चोडणेकर या विद्यार्थिनीने ९१.६७ टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. मिलाग्रीसची विद्यार्थीनी सना चोडणेकर ९१.६७ टक्के गुण मिळवित चतुर्थ ठरली. तालुक्यातील मिलाग्रीस, आंबोली, बांदा , नेमळे व सांगेली या ५ प्रशालांनी आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यात ८७१ मुले व ८३४ मूली मिळून एकूण १७०५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८५८ मुले तर ८३० मुली मिळून एकूण १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एसपीके – श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा १२ वीचा निकाल ९९.६५ टक्के एवढा लागला आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स विभागात २८६ पैकी २८५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत प्रथम साईश कांबळी ८६.३३ टक्के, द्वितीय सानिया आंगचेकर ८४.६७ टक्के तर मॅकलीन लोबो ८२.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. आर्ट्स विभागात सानिया आंगचेकर ८४.६७ टक्के प्रथम, दिशा नाईक ७५.८३ टक्के द्वितीय, सोनालीका पेडणेकर ६५.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर कॉमर्स शाखेत सोहा सावंत ७८.५० टक्के प्रथम, द्वितीय निशिगंधा सावंत ७४.८३ टक्के तर तृतीय प्रिती पुरोहित ७७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सायन्स शाखेतून साईश कांबळी ८६.३३ टक्के प्रथम, ८२.३३ टक्के मॅकलीन लोबो द्वितीय, लावण्या रेडकर ८२ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा १२ वीचा निकाल आर्ट्स ९९.६२ टक्के, कॉमर्स ९९.६९ टक्के, सायन्स ९९.६२ टक्के तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात १०० पैकी १०० गुण भक्ती गुडगीळ हीन अकाउंटन्सी विषयात प्राप्त केले. तर श्रावणी रासम, सिद्धार्थ आडेलकर, आदिती चव्हाण, तन्मय गवस, सिमरन पास्ते यांनी आयटी विषयात १०० गुण मिळवत विक्रम रचला आहे.

यात प्रशालेत कला विभागात खुशी रेडकर ८७.५० टक्के प्रथम, द्वितीय स्नेहल गावडे ८५.५० टक्के तर सेजल नाईक ८४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कॉमर्स विभागात वैष्णवी भांगले ९२.५० टक्के प्रथम, धनेश नाईक ९१ टक्के द्वितीय, आर्या कुरतडकर ९०.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर विज्ञान शाखेत राहुल गावडे ९२.८३ टक्के प्रथम, द्वितीय पार्थ राऊळ ९०.५० तर तृतीय श्रावणी रासम व सलोनी कोटकर ८७.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी शाखेतून निलेश सावंत ६२.३३ टक्के प्रथम, टक्के द्वितीय वासुदेव गावडे ५९, ५८.३३ टक्के गुण मिळवत धनश्री राऊळ हीन तृतीय क्रमांक पटकावला आहे.

मिलाग्रीस महाविद्यालय, सावंतवाडीचा १२ वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. कॉमर्स अँड सायन्स विभागातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत विज्ञान शाखेत स्वरा दळवी ८३.१७ टक्के प्रथम, द्वितीय आयडोनिया परेरा ८०.१७ टक्के तर सेबास्टियन सालदान्हा ७७.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कॉमर्स विभागात सना चोडणेकर ९१.६७ टक्के प्रथम, रोशनी सावंत ८८.१७ टक्के द्वितीय, डेन्झिल डिसोझा ८३.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सांगेली : माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून परिक्षेला एकूण १०२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. कला शाखेतून अक्षता ७०.८० टक्के, द्वितीय शुभम पवार ५७.३३ टक्के, कनिषा चव्हाण हिने ५४.१७ टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

वाणिज्य शाखेतून खुशी राऊळ ७६.६७ टक्के, द्वितीय मंजुषा राऊळ ६८.१७ टक्के तर तृतीय विद्या राऊळ ६७.५० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तर विज्ञान शाखेतून प्रतीक्षा गावडे ७७.५० टक्के प्रथम, देवांक सावंत ७३.६७ टक्के द्वितीय तर इशा सांगेलकर ७३.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.

आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. प्रशालेतून तेजल धोंडू शेळके ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथ

 

प्रतिक्रिया व्यक्त करा