You are currently viewing ज्येष्ठ पत्रकार लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा लिखित लेखमाला

ज्येष्ठ पत्रकार लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा लिखित लेखमाला

*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे:- श्रीनिवास गडकरी*

 

१९८२ ते २००९ पर्यंत आम्ही खोपोली येथे वास्तव्यास होतो. अनेक स्थानिक साहित्यिक कार्यक्रमांना आम्ही तेव्हा उपस्थित रहात असू. पेण, पनवेल, कर्जत, वाशी, उरण, अलिबाग, माणगाव, हरिहरेश्वर या ठिकाणी गेलो आहोत.

१९९६ मध्ये मराठी साहित्य मंडळ, पेण तर्फे जिल्हास्तरीय दो दिवसीय साहित्य संमेलन झाले. या मंडळात प्रकाशक करंदीकर, कादंबरीकार विलास फडके, पत्रकार श्रीनिवास गडकरी आदि दिग्गज मंडळी होती. अतिशय उत्तम प्रतिसाद जिल्ह्यातील साहित्यिक वर्गाचा मिळाला. या संमेलनाचे सूत्रसंचालन श्री. श्रीनिवास गडकरी यांनी अतिशय बहारदार केले.

या संमेलनात कवींसाठी एक आगळीवेगळी चित्र काव्य स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये मी उत्स्फुर्तपणे स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या स्पर्धेचे ज्येष्ठ कवी ए के शेख आणि अन्य मान्यवर परिक्षक होते.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रिय कवी, संगीतकार मा. यशवंत देव होते. माझ्या कवितेला यात प्रथम क्रमांक मिळाला.माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा क्षण होता. मा. यशवंत देव यांनी मला मंचावर त्या कवितेचे पुन्हा सादरीकरण करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी लोकप्रिय कृषीवल दैनिकासह जिल्ह्यातील वृत्तपत्रांनी त्या कवितेस, वृत्तास ठळक प्रसिद्धी दिली.

मा. श्रीनिवास गडकरी यांची तिथे तेव्हा ओळख झाली. आणि परिचयाचे मैत्रीत रूपांतर झाले.

श्रीनिवास गडकरी म्हणजे एक अतिशय लाघवी, हसतमुख व्यक्तीमत्व. त्यांचे मूळ गावं रोहा, रायगड. त्यांचे आई वडील तिथे असतात. ते नोकरी निमित्त तीस वर्ष पेण मध्ये होते. आता पुण्यात बावधन येथे स्थायिक झालेत. त्यांनी सिंडीकेट बँकेत पस्तीस वर्ष नोकरीं केली. जानेवारी २०२० ला ते सेवा निवृत्त झाले. मी कॅनरा बँकेत कोळखे शाखेत होतो. आमची दांडफाटा, पनवेल येथे भेटी होत. आता तर सिंडिकेट बँक सरकारने कॅनरा बँकेत विलीनीकरण केल्याने आम्ही एकाच बँकेत सेवानिवृत्ती नंतर आलो.

लोकसत्ता, साप्ताहिक चित्रलेखा व मुंबई तरुण भारत चा वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्र व मासिकांतून विपुल लेखन तसेच सदर लेखन त्यांनी केले.

त्यांची एकूण पंचविस पुस्तके प्रकाशित असून त्यातल्या काहींना पुरस्कार मिळाले आहेत.

एकूण तीन पुस्तकांना शासकीय शिफारस करण्यात आली त्यांच्या प्रत्येकी पाच आवृत्या प्रसिद्ध.

सध्या निवृत्ती नंतर विपुल प्रमाणात काव्य लेखन.

कवितेचे सर्वच प्रकार त्यांनी हाताळले आहेत.

ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.

नोकरीं निमित्त पातळगंगा ब्रांच ला बदलून आले. तेव्हा hoc च्या टाउनशिप मधेच राहात होते. तेव्हा त्या परिसरात इंडस्ट्रीज मुळे सुशिक्षितांची वस्ती मोठी होती. तीही बहुभाषिक. त्यांनी “प्रेरणा” नावाची एक संस्था स्थापना केली. या संस्थेतर्फे मग दर वर्षी मोठा कला आणि क्रीडा महोत्सव भरे. त्याच्या कला विभागाचे ते प्रमुख होते. या महोत्सवाला खूप जोरदार प्रतिसाद असे. तो परिसर महिना दीड महिना ‘ प्रेरणामय ‘ होऊन जाई.त्या महोत्सवाच्या आयोजना व्यतिरिक्त शेवटच्या दिवशी सूत्र संचालक असे. सूत्र संचालक म्हणून त्यांचा तिथेच उदय झाला.

पुढे पेण ला राहायला गेल्यावरही महोत्सवाला ते रसायनीत येत. मोठी जबाबदारी पार पाडत असत. खूप आनंददायी व बरच काही शिकवणारे असे.

त्यांनी पत्र कारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि मग ते संपलं.

लोकसत्तेत ते खूप पूर्वी पासूनच लिहीत होते. पुढे लोकसत्तेने वार्ताहर म्हणून काम करणार का विचारलं. सामाजिक प्रश्नांची मांडणी करायला चांगलं व्यासपीठ या उद्देशाने त्यांनी ते स्वीकृत केलं.

आणि खरोखर त्या कामी त्याचा खूप उपयोग झाला. पत्रकार म्हणून अनेक सामाजिक प्रश्न लोकसत्तेत त्यांनी हिरीरीने मांडले. लोकसत्ते ने ते अगदी फ्रंट पेज वरही छापले.

“आदिवासी हक्क संघर्ष समिती “ही संस्था आदिवासी हक्कांसाठी खूप तळमळीने काम करते. आज तिचं नाव मोठं आहे. पण १९९२ ला ते पेण मध्ये गेल्यावर मा. वैशाली पाटील तिथे आली आणि तिने काम सुरु केलं. सामाजिक प्रश्नाच्या ओढीने ते त्यात सामील झाले. वैशालीशी खूप निकटचे संबंध जोडले गेले. लोकसत्तेची वार्ताहर कीं तुम्ही सामाजिक प्रश्नांच्या सोडणुकी साठी मुद्दाम घ्या हा तिचाच आग्रह होता. तो पुढे सार्थ ही ठरला. अनेक मोर्चे, मीटिंग यात ते नोकरी सांभाळून जात राहिले.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा