बुलढाणा : येथिल जेष्ठ कवी ‘लेखक सर्जेराव चव्हाण’ यांची यंदाच्या ‘संजीवनी’ संस्थेचा सन्मानाचा ‘राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार २०२४’ साठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार वितरण जून मध्ये दि. ६ / ६ /२० २४ रोजी केळवद गावी होणार आहे.
साहित्य क्षेत्रात गाजलेले ‘आपण गाफील राहीलो तर..’ या काव्यसंग्रहाचे लेखक कवी सर्जेराव चव्हाण हे जुन्या पिढीतील अभ्यासू लेखक असून त्यांना यापूर्वीच मुक्त विद्यापिठाचा विशाखा काव्य पुरस्कार, कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, पुर्णा येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार, सोलापूरचा – काव्यसाधना पुरस्कार, अंकूर चा अक्षरतपस्वी पुरस्कार, क्रांती ज्योती पुरस्कार, पुणे येथिल सत्यशोधक केळवद येथिल शाहीर अमर शेख साहित्य आदी पुरस्कार मिळाले असून सत्यशोधक चळवळ फुले, शाहू आंबेडकर, चळवळ लेखन, शिबीरे, कवि संमेलने, साहित्य संमेलने यात सहभागी असून अखिल भारतीय साहित्य संमेलनातही निमंत्रीत कवी म्हणून हजेरी लावली आहे. आकाशवाणी ‘दुरदर्शन’ या वर अनेक वेळा काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर झाला आहे. सर्जेराव चव्हाण वयाच्या ७५ वर्षीही जोमाने काव्य सादर करतात. पुस्तके वाचतात लिहीतात. नवीन साहित्य पिढी युवक नवलेखक यांना मोलाचे मार्गदर्शक करणारे सर्जेराव चव्हाण बुलढाणा जिल्ह्याचे ‘साहित्य भूषण’ आहेत. त्यांच्यावर साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .