You are currently viewing कवियत्री भाग्यश्री बागड ( गुजरात ) यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले संजीवनी पुरस्कार

कवियत्री भाग्यश्री बागड ( गुजरात ) यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले संजीवनी पुरस्कार

 

भाग्योदय लेखणीचा मंच चे अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई राकेश बागड यांना महाराष्ट्र यंदाचा राज्यस्तरीय ‘संजीवनी काव्यरत्न पुरस्कार’ 2024 जाहीर झाला आहे.

साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेवून सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. संजीवनी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि. बुलढाणा (विदर्भ) ही महाराष्ट्रातील अग्रगण्य महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था असून या संस्थेव्दारे विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे कार्य पुर्ण महाराष्ट्रभर आहे. या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्तीभाऊ जाधव असून त्यांनी विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती निवडून त्यांना संस्थेव्दारे राज्यस्तरीय पुरस्कृत केले आहे. त्यांनी यापूर्वीच सतत २ वर्षे अंतरराज्य राष्ट्रीय बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजनही केले आहे. कवीयत्री भाग्यश्री बागड यांच्या साहित्य सेवेची दखल घेवून पुरस्कार समितीचे अध्यक्ष मनोहर पवार यांनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या भावी साहित्य सेवेला कार्याला अनंत शुभेच्छा ! भाग्यश्रीताई यांना यापूवीच अनेक साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा