*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निवडणूकीचं वारं*
वारं आलं वारं आलं निवडणूकीचं वारं आलं
भुईमुगाला शेंगा फुटाव्या अचानक तसं प्रचाराचं पेव फुटलं
निवडणूकीच्या झाडावर बसले सुवर्ण पक्षी
तश्या कार्यकर्त्यांच्या खिशात येऊ लागल्या राशी
एकेक पक्षाची साथ धरून सुवर्ण फळाची आशा वाढली
प्रचार सुरू झाला जोरात नशा जोर धरू लागली
जो तो लागला कामाला आपल्या पक्षाच्या प्रचाराला
पक्ष आपला बावनकशी सोनं याचच गाणं गाऊ लागला
हेवेदावे दुजाभाव करीत प्रचार फेऱ्या झडू लागल्या
मतदाराला मतदानाच्या हक्काचे ज्ञान तेवढे शिकवू लागल्या
जातीपातीचे गणित सोडवण्यास रंग धरू लागले
धर्माच्या नावाखाली मतं विभागू लागले
मते मतांतर सत्ता सत्तांतर उलथापालथ सुरू झाली
मतदान करून मतदाराने हक्काची अंमलबजावणी केली
विकासाच्या अपेक्षांचा भंग होत राहिला
विकास कागदोपत्री झाला मतदार आशेवरच राहिला
गरीबी लाचारी कर्जबाजारी महागाईची थट्टा मस्करी झाली
कार्यकर्त्यांची मात्र चांदी होत राहिली
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.