You are currently viewing कवियत्री भाग्यश्री बागड ( गुजरात ) यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले संजीवनी पुरस्कार

कवियत्री भाग्यश्री बागड ( गुजरात ) यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले संजीवनी पुरस्कार

*कवियत्री भाग्यश्री बागड ( गुजरात ) यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले संजीवनी पुरस्कार*

भाग्योदय लेखणीचा मंच चे अध्यक्षा ‘सौ . भाग्यश्रीताई राकेश बागड यांना महाराष्ट्र यंदाचा राज्यस्तरीय ‘ संजीवनी काव्यरत्न पुरस्कार ‘ 2024 जाहीर झाला आहे !
साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेवून सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली . संजीवनी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि. बुलढाणा ( विदर्भ ) ही महाराष्ट्रातील अग्रगण्य महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था असून या संस्थेव्दारे विविध उपक्रम राबविले जातात . संस्थेचे कार्य पुर्ण महाराष्ट्रभर आहे . या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्तीभाऊ जाधव असून त्यांनी विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती निवडून त्यांना संस्थेव्दारे राज्यस्तरीय पुरस्कृत केले आहे . त्यांनी यापूर्वीच सतत २ वर्षे अंतरराज्य राष्ट्रीय बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजनही केले आहे . कवीयत्री भाग्यश्री बागड यांच्या साहित्य सेवेची दखल घेवून पुरस्कार समितीचे अध्यक्ष मनोहर पवार यांनी त्यांची निवड केली आहे . त्यांच्या भावी साहित्य सेवेला कार्याला अनंत शुभेच्छा ! भाग्यश्रीताई यांना यापूवीच अनेक साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा