नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे काळाची गरज – लखमराजे भोसले.
विश्व कला डान्स अकॅडमीच्या “कथ्थक” शोचे उत्साहात उद्घाटन…
सावंतवाडी.
“कथ्थक” सारखी पाश्चिमात्य कला जोपासणार्या नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी विश्व कला डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य नेहमीच आपण करू, असा विश्वास सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे व्यक्त केले.
दरम्यान या ठिकाणी “कथ्थक” प्रशिक्षणाचे धडे देऊन तुळशीदास आर्लेकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येथील कलाकारांना अनोखी संधी दिली आहे, त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्याच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. विश्व कला डान्स अकॅडमीच्या आठव्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भरतनाट्यम्सच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत.
यावेळी ॲड. पी.डी. देसाई, श्रीधर पांचगे, दीपेश शिंदे, अजित मसुरकर, कल्पना बांदेकर,पत्रकार भुवन नाईक, विश्व डान्स अकॅडमी चे संचालक तुळशीदास आर्लेकर, सौ. शितल आर्लेकर आदी उपस्थित होते. यावेळी भरतनाट्यम मध्ये रामायण, शिवतांडव, वेस्टर्न भरतनाट्यम फ्युजन, लावणी आदी नृत्य सादर करण्यात आले. तसेच श्री. भोसले यांच्या हस्ते नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश लाखे, राहुल सूर्यवंशी, अजित मसुरकर, प्रतीक मसुरकर, शेखर चव्हाण, संदेश साबळे, मिहिरा सूर्यवंशी, धनश्री चव्हाण, जागृती चव्हाण, तन्वी राऊत आदींनी सहकार्य केले.