उपोषणकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली माहिती
सावंतवाडी
मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांच्या मनमानी काभारविरुद्ध माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर पुकारलेले उपोषण चर्चेअंती मागण्या मान्य करण्यात आल्याने स्थगित करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली. मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी तसेच इतर विविध मागण्यांसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा मंगेश तळवणेकर यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यास अनुसरून सोमवारी मंगेश तळवणेकर यांची पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनात चर्चा झाली. या चर्चेअंती मळगाव गावातील शाळकरी मुलांच्या ईबीसी फार्मवर ग्रामपंचायतीकडे प्राप्त मुलांच्या दाखल्यावर सही करून दाखले देण्यात आलेले आहेत.आज अखेर ग्रामपंचायतीकडे एकही दाखला प्रलंबित नाही. ग्रामनिधीतून दिव्यागांना ५ टक्केप्रमाणे योजनांचा लाभ देण्याबाबत सन २०२०-२१ सालासाठी योजना तयार करण्यात आल्या असुन अंदाजपत्रकाच्या तरतुदीस अधीन राहुन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० ची आदर्श आचारसंहिता संपुष्ठात आल्यानंतर प्राप्त प्रस्तावानुसार संबंधिताना लाभ देण्यात येईल. सन २०२०-२१ च्या पूर्वीचा दोन वर्षाचा प्रलंबित २.५ टक्केप्रमाणे अखत निधी खर्च करण्याबाबत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग।मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परगनगीसाठी प्रस्ताव सादर करून मंजुरी प्राप्त होताच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० ची आदर्श आचारसहिता संपताच कार्यवाही करण्यात. येईल. मळगाव ग्रामपंचायत हद्दीतील गाव मौजे कुभार्ली येथील कमी करण्यात आलेली आशा स्वयंसेविका ही कोविड-१९ च्या टाळेबंदीच्या कालावधीत एप्रिल २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत आरोग्य खात्याकडील अहवालानुसार गैरहजर राहिल्याने व त्यांना दिलेल्या पत्राचे उत्तर मुदतीत न दिल्याने कमी करण्यात आले होते. परंतु ही निवड ग्रामसभेत असल्याने शासनाकडून ग्रामसभा घेणे संदर्भात आदेश आल्यास त्याबाबतची कार्यवाही करणेत येईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर २०२० चे वेतन अदा केले असुन आता त्यांची कसलीही तक्रार ग्रामपंचायतीकडे प्राप्त नाही. आदी मागण्या।मान्य केल्याने उपोषण स्थगित केल्याचे मंगेश तळवणेकर यांनी सांगितले.