दोन भल्या मोठ्या गव्यांची परूळेकर हाॅस्पीटल समोर हजेरी
बंदोबस्त करा अशी डॉ जयेंद्र परूळेकरांची मागणी…
सावंतवाडी
गेले काही दिवस शहरातील भरवस्तीकडे येणाऱ्या गवा रेड्यांनी आज येथील डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या परूळेकर नर्सिंग होम समोर आपली हजेरी लावली. यावेळी अचानक दोन गवे हॉस्पिटलच्या दारात आल्यानंतर डॉक्टरसह पेशंटची गाळण उडाली. सुदैवाने कोणालाही त्या गव्यांनी दुखापत केली नाही, मात्र काही मिनिटातच ते गवे बाजूच्या जंगलात निघून गेले.
दरम्यान या प्रकाराबाबत डॉ. परुळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे भरवस्तीत येणाऱ्या गव्यांना रोखण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्र्याच्या कुंपणावरून जंगलात जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाजूला राहणाऱ्या शिर्के यांच्या कुंपणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.