You are currently viewing जेष्ठ कवी,गझलकार,पत्रकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त तळेरे येथे ‘नानिवडेकर, गझला आणि आठवणी’ कार्यक्रम संपन्न 

जेष्ठ कवी,गझलकार,पत्रकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त तळेरे येथे ‘नानिवडेकर, गझला आणि आठवणी’ कार्यक्रम संपन्न 

जेष्ठ कवी,गझलकार,पत्रकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त तळेरे येथे ‘नानिवडेकर, गझला आणि आठवणी’ कार्यक्रम संपन्न

कणकवली

दिवंगत जेष्ठ कवी, गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त तळेरे येथे ‘नानिवडेकर, गझला आणि आठवणी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवी, अभिनेते प्रमोद कोयंडे यांनी नानिवडेकर यांच्या विविध गझला सादर केल्या.

तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील “मधुकट्टा” येथे पुष्पहार अर्पण करून मधुसूदन नानिवडेकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच त्यानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नानिवडेकर यांच्या गझला आणि कवितांचे सादरीकरण कवी, गझलकार प्रमोद कोयंडे यांनी तळेरे येथील प्रज्ञागन सभागृहात केले.

मधुसूदन नानिवडेकर यांचे शेवटची चार वर्षे तळेरे येथे वास्तव्य होते. आणि इतर ठिकाणापेक्षा तळेरे येथेच ते अधिक रमले होते. शिवाय, तळेरे येथील सांस्कृतिक, पत्रकार क्षेत्रात ते मार्गदर्शन करत होते. १८ मे हा दिवस म्हणजे स्व.मधुसुदन नानिवडेकर यांचा जन्म दिवस. त्यांचा जन्म दिवस तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी त्यांच्या उपस्थितीत तळेरे येथे साजरा केला जात असे. पण त्यांच्या अकाली निधनानंतर हा दिवस जयंती दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात येते.

विविध गझला आणि आठवणी:-
यावेळी प्रमोद कोयंडे यांनी नानिवडेकर यांच्या गझला सादर करतांना त्या गझलांमागील अर्थ, काही आठवणी व्यक्त केल्या. अनेक गझला, कवितांमधून नानिवडेकर किती सहजतेने अनेक भावना मांडायच्या हे अनेक वेळा दाखवून दिले. यावेळी तुझी याद येते वेळी अवेळी, हरकत नाही, घर, ठरावाप्रमाणे, तू आल्यावर, भलभलते या नानिवडेकर यांच्या गझलांसह प्रमोद कोयंडे यांची हरकत आहे ही रचना सादर केल्या.

नानिवडेकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या गझला आणि कवितांचे सादरीकरण कवी, अभिनेते प्रमोद कोयंडे यांनी केले. हा कार्यक्रम मधुकट्ट्यावरील अभिवादनानंतर श्रावणी कॉम्प्यूटर सेंटरच्या सभागृहात प्रज्ञांगण, संवाद परिवार, अक्षरोत्सव परिवार, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी कवी अभिनेते प्रमोद कोयंडे, संवाद परिवाराचे संजय खानविलकर, प्रज्ञांगणचे सतीश मदभावे, अक्षरोत्सव परिवाराचे निकेत पावसकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर आदी उपस्थित होते. यावेळी निकेत पावसकर यांनी नानिवडेकर यांची ओळख करून देताना विविध आठवणी जागवल्या. तर सतीश मदभावे यांनी मनोगत व्यक्त केले. तर रोशनी बागवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा