*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भौतिक मृगजळ*
****************
आजकाल कुठे कसेही शोधले तरी
माणूसपण मात्र कुठे सापडत नाही
सर्वत्र , आसक्तीचा हव्यास जीवाला
मनभावनांचा शिडकावा कुठेच नाही….
कुठले ऋणानुबंध अन कुठली नाती
प्रेमभाव नि:स्वार्थी कुठेच उरला नाही
व्याख्या सुखाच्याच जगती बदलल्या
ओढ , वात्सल्यप्रीतीची कुणाही नाही….
सत्यवास्तव भौतिक मृगजळा सारखे
त्यापाठी धावणे कुणीच सोडत नाही
नाही बदलली कधी सृष्टी अन वसुंधरा
मनुजा हे तुला कां कधी कळणार नाही….
*****************************
*रचना क्र. ८४ / १९ / ५ / २०२४*
*#©️ वि. ग.सातपुते.(भावकवी )*
*📞( 9766544908 )*