You are currently viewing आई

आई

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आई*

 

आई तुझी आठवण

मनभरुन वाहते

तुझ्यावाचून हे जीणे

सुने जुनेच राहते

 

 

किती जोजविले मला

कसे वाढविले मला

स्वतः सोसून उन्हाळा

दिला गारवा जिवाला

 

 

माझ्यासाठी चाले तुझी

वणवण दिनरात

सुखे पेरली घरात

दु:ख ठेवून उरात

 

 

जशी पक्षिणी आकाशी

किंवा गाय रानीवनी

तशी हिंडली तू आई

देहभान हरपुनी

 

 

काटेकुटे खाचखड्ये

तुडविले आनंदाने

अश्रू हळूच टिपून

गाईले तू गोड गाणे

 

 

आई तुझ्या कष्टातून

स्वप्न तुझे साकारले

मोहोरल्या झाडापरी

जीणे माझे आकारले

 

 

*कवयित्री*

*अनुपमा जाधव*

*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*

प्रतिक्रिया व्यक्त करा