You are currently viewing बांदा उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी; पत्रादेवी पर्यंत वाहनांच्या रांगा…

बांदा उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी; पत्रादेवी पर्यंत वाहनांच्या रांगा…

बांदा उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी; पत्रादेवी पर्यंत वाहनांच्या रांगा…

सावंतवाडी

मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथे चालू असलेल्या उड्डाण पूलाच्या कामामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान वाहतूक कोंडी एवढी झाली होती की बांदा चौक ते पत्रादेवी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज रविवारचा दिवस असल्यामुळे गोव्याहून येणारे पर्यटक, त्याचप्रमाणे आंबोली मार्गे गोव्याला जाणारे पर्यटक यांच्या वाहनांची एकच गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. बांदा वहातूक पोलीस हे ओवेसी कॉम्प्लेक्स समोरील ब्रिज खाली ट्राफिक सोडविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंबोली निमजगा मार्गे बांदा महामार्गावर येणाऱ्या ठिकाणी जास्त कोंडी होत होती. त्यामुळे वाहतूक टप्प झाली होती. निमगाव रस्त्यावरून बांदा ठिकाणी येणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी हि वहातूक पोलीस ठेवणे गरजेचे आहे. आज या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी भैय्या गोवेकर स्वतः उभे राहून वाहनांना वाट मोकळी करून देत होते. बांदा पोलिसांनी या ठिकाणी जास्त वाहतूक पोलीस ठेवून वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा