You are currently viewing इळये सडा येथे कीटकनाशक प्राशन केल्यामुळे ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू

इळये सडा येथे कीटकनाशक प्राशन केल्यामुळे ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू

इळये सडा येथे कीटकनाशक प्राशन केल्यामुळे ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू

देवगड

देवगड तालुक्यातील इळये सडा येथील वैशाली रमेश वारंग हिने कीटकनाशक प्राशन केल्याने तिला उपचारासाठी देवगड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.ही घटना १७ मे रोजी रात्री १०:४५ वाजता घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील इळये सडा येथील वैशाली रमेश वारंग वय ६३ हिने राहत्या घरी १७ मे रोजी आंबा कलमावर फवारणी करण्यासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे तिला देवगड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला याबाबतची खबर तिचा मुलगा सचिन रमेश वारंग वय ३९ यांनी देवगड पोलिसात दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करत आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा