You are currently viewing डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा बागायतदार चर्चासत्राचे २१ मे रोजी आयोजित

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा बागायतदार चर्चासत्राचे २१ मे रोजी आयोजित

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा बागायतदार चर्चासत्राचे २१ मे रोजी आयोजित

देवगड
रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी देवगड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा बागायतदार चर्चासत्र मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत इंद्रप्रस्थ हॉल हॉटेल डायमंड च्या मागे देवगड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्र कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. संजय भावे (कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश शिंगारे ( संशोधन संचालक प्रमुख )प्रमुख अतिथी डॉ. सुरेंद्र पतंगे,( सहयोगी अधिष्ठाता )काढणी पश्चात व्यवस्थापन महाविद्यालय रोहा डॉ. केतन चौधरी (विस्तार शिक्षण विभाग प्रमुख) हे उपस्थित राहणार आहेत.

या चर्चासत्रात आंबा लागवड तंत्रज्ञान आणि आंबा पुनरुज्जीवन डॉ.के व्ही मालशे कृषी विद्यापीठ आंबा कीड व्यवस्थापन डॉ.ए.वाय मुंज,(उद्यान विद्यावेता) आंबा काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन डॉ. एस बी स्वामी(विभागप्रमुख)) हे मार्गदर्शन करणार आहेत.या चर्चासत्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी मँगो सिटी देवगड प्रेसिडेंट प्रवीण पोकळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा