You are currently viewing डाॅ. प्रतिमा इंगोले यांना शतकोत्तर रौप्य महोत्सवी पुरस्कार

डाॅ. प्रतिमा इंगोले यांना शतकोत्तर रौप्य महोत्सवी पुरस्कार

पुणे – (प्रतिनिधी)

“एक पणती उजेडासाठी” ह्या डाॅ.प्रतिमा इंगोले यांनी त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांच्यावरील मौल्यवान ग्रंथाला प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था पुणे (महाराष्ट्र)यांचा चरित्र ग्रंथाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

पाच मे ला ह्या पुरस्काराचे पुणे येथे वितरण संपन्न झाले. ह्या मौल्यवान ग्रंथाचे परीक्षण वर्हाडी कवी श्री.राजा धर्माधिकारी यांनी केले आहे. हा पुरस्कार डाॅ. प्रतिमा इंगोले यांनी त्यांनाच अर्पण केला आहे. “एक पणती उजेडासाठी” ह्या ग्रंथाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे. तसेच डाॅ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेला एकशे पंचवीसावा पुरस्कार आहे.ह्यापूर्वी त्यांना शासनाचे सात राज्य पुरस्कार मिळाले आहेत.

ह्या ग्रंथाला सोलापूरे राज्य पुरस्कार गडहिंगलज तसेच, धर्मावीर संभाजी राजे पुरस्कार फलटण जि पुणे असे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

एक पणती उजेडासाठी हा ग्रंथ सर्वांनी संग्रही ठेवावा असा आहे. तसेच शिक्षकांना प्रेरणादायी आहे.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा