You are currently viewing हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार नितेश राणे

हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार नितेश राणे

हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार नितेश राणे

* नुकसान ग्रस्त कुटुंबांना सिमेंट पत्रे आणि छताची कैले केली घरपोच

*वादळी वाऱ्यात हरकुळ बुद्रुक येथील १५ ते २० कुटुंबियांच्या घरांचे झाले होते मोठे नुकसान

कणकवली

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी व खडक वाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले. या ठिकाणच्या पंधरा ते वीस घरांचे नुकसान या वादळी वाऱ्यात झालेले होते. घरांचे छत, छताचे पत्रे, कैले वाऱ्याने उडून गेली होती.तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते. या सर्वांना मदतीचा हात म्हणून सिमेंट पत्रे आणि छताची कैले आमदार नितेश राणे यांनी तातडीने घर पोच केली.
यावेळी भाजप उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर,चंद्रकांत परब,इम्रान शेख,अनिल खोचरे,आबा खोचरे, बडेमिया शेख यांच्यासह सरफराज शेख, बशीर शेख, सईश शेख, नुरमहंम्मद शेख, आबीदाबा शेख, सफराज शेख, सलाम शेख, हुसेनबी शेख, निमायत पटेल यांना पत्रे तर बाबू पटेल, चाँद पटेल, नयफ पटेल, राफार पटेल, अायुब पटेल, रमिज पटेल, हमिर पटेल, सुलतान पटेल, सईद नाईक, अब्बास शेख, इमरान शेख, गुलाब शेख, अब्दूल शेख, शोयब पटेल, नासीर पटेल, सरफराज शेख, शनिफ शेख, मोहसीन शेख, मुकसाना नाईक, शाहरूख शेख यांना कौले व पत्रे देण्यात आले.
दरम्यान या सर्वच नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा