*सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*
सावंतवाडी :
सावंतवाडी सबनिसवाडा येथील श्री एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा सावंतवाडी येथे वैशाख शुद्ध द्वादशी सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी पादुका मंदिर वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी ६.०० वाजलेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून सर्व भाविक गुरुभक्तगणांनी सोहळ्याला उपस्थित राहून श्रींचे कृपाशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक सल्लागार उपसमिती, सावंतवाडीने केले आहे.
या निमित्ताने सोमवारी सकाळी ६.०० ते सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत श्री.एकमुखी दत्तमूर्ती पूजा, एकादशमी, लघुरुद्र, अभिषेक, नामस्मरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८.०० वा. श्री सत्यदत्त महापूजा, दु.१२.३० महाआरती, १.०० वा. महाप्रसाद, सायं. ५.०० तीर्थप्रसाद, सायं.७.०० नामस्मरण, ७.३० महाआरती, रात्रौ ७.४५ वा. स्वामींचा पालखी सोहळा व स्थानिक दत्तगुरुभक्तांचे भजन, रा.८.३० वा. श्री गुरुप्रसाद भजन मंडळ, सालईवाडा, सावंतवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री.दयानंद गवस यांचे परिवाराकडून श्री स्वामी चरणी महाप्रसादरुपी सेवा अर्पण करण्यात आली आहे.