You are currently viewing काळे डगले ! हातोडा

काळे डगले ! हातोडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*काळे डगले ! हातोडा*

 

उदास चेह-याची गळक्या डोळ्यांची

अंगरख्याची शिवण उसवलेली

पिंज-यात फतकल मारून बसलेली

अपराधी माणसं मी रोजचं पाहतो

 

सर्वनाशाच्या डबक्यांत शहारलेली

म्लान मुक्या तोंडाची दबलेली

कण्हत कुथत विखरून पसरलेली

अपराधी माणसं मी रोज पाहतो.

 

काळ्या डगल्यांनी घेरलेली

कोर्टात दिवसभर टांगलेली

हातोडा फिरवत शिक्षा देणारी

उंचावरून न्यायाधीशाच्या भूमिकेत

गांधीसोबत मी रोजच पाहतो..

 

बिचकलेली श्वापद आवार धुंडाळत

ओथंबलेल्या अजीजीने विव्हळत

सैरभैर कोर्टाच्या अभद्र वातावरणात

अस्वस्थ अनावर होतांना रोजच पाहतो

 

त्या चौकोनी रिंगणात आक्रोश करत

डोक जमीनीवर आपटणारे अपराधी

न्यायाधीशाचा ऑर्डर ऑर्डर आवाज

कानात गोठवून घेणारे अपराधी….

मी रोजचं पहातो…….

 

काळे डगले हल्ली माझ्या सभोवती

गोळा होवून!मला घेरू लागले ..

मला प्रेतताटीवरून उचलून

त्या चौकोनात उभे करू लागले ..

 

अपराधी माणसात मी मला हल्ली रोजच पाहत असतो….!

वेड्यागत भांबावून रोजचं गजाआड जातो !!!काळे डगले..ऑर्डर ऑर्डर

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा