सावंतवाडी:
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा त्रेचाळीसावा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक १९ मे रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव मराठी शाळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याचे सदस्य त्यांना भावलेल्या आत्मकथनाविषयी बोलतील. सुनिता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’, मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘करुळचा मुलगा’, शरद बाविस्कर यांच्या ‘भूरा’ अश्या विविध आत्मकथनावर चर्चा होईल.
तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.