You are currently viewing आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – विशाल परब

आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – विशाल परब

*आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – विशाल परब*

वेंगुर्ला

आसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ ता. वेंगुर्ला शतक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत शतक महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

गावचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने गावात किती सोयी सुविधा उपलब्ध आहेत यावर अवलंबून आहे. गावात पायाभूत सुविधांचा असलेला अभाव दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. ग्रामस्थांनी त्यांना कोणत्याही समस्या असल्यास मला नक्की आवर्जून हक्काने सांगा असा विश्वास परब यांनी यावेळी दिला.

प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी, मेघशाम नाडकर्णी, भालचंद्र दीक्षित, सुनील मोरे, सदानंद गावडे, दिनकर नागवेकर, विश्वनाथ धुरी, सरपंच बाळा मधुकर जाधव, उदय धुरी, संजय गावडे, सुजाता देसाई, सुधीर आसोलकर, विजय धुरी, सुरेश धुरी, प्रसाद गावडे, प्रकाश रेगे, भास्कर केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा